आशिष शेलार ग्रेटर हैदराबाद मनपा निवडणुकीसाठी भाजपाचे सहप्रभारी नियुक्त

Ashish Shelar

मुंबई : भाजपाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी (Greater Hyderabad Municipal Corporation election) भाजपाचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) व माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी वर्णी लागली. त्यानंतर आता पक्षश्रेष्ठींकडून भाजप नेते आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी दिवाळी गिफ्ट मिळालं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. व कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर, महाराष्ट्रातील नेते आशिष शेलार, गुजरातचे नेते प्रदीप सिंह वाघेला आणि कर्नाटकचे नेते सतीश रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून निवड केली आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर भाजपा नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद सोपवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER