जमले तर मंत्रिमंडळातील ‘सखाराम बाइंडर’ प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा

मुंबई : शासकीय विमानातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना प्रवास नाकारत त्यांना उतरवल्यानंतर मोठा राजकीय वाद रंगला आहे. भाजपाने (BJP) ठाकरे सरकारवर आरोप करत आकसापोटी राज्यपालांना अशी वागणूक देण्यात आली, इतका अंहकार करू नका, असे म्हटले होते, तर यावर भाजपाच्या तोंडून अहंकाराची भाषा शोभत नाही, राज्यपालांचे काय करायचे हा भाजपाचा प्रश्न आहे, असा टोला शिवसेनेने (Shivsena) लगावला होता. शिवसेनेने आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाला लक्ष्य केले आहे. त्यावरून भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले की, राज्यपालांचे करायचे काय, असा प्रश्न पडलाय? म्हणजे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेचे करायचे काय? असं विचारताय का? तीच तुमची खरी अडचण आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच ठाकरे सरकार आल्यापासून हेच तर सुरू आहे. घटनेनुसार शपथ घेतली नाही, घटनेनुसार सभागृहात वागत नाही. घटनेनुसार विधिमंडळाचे कामकाज होत नाही.

घटनेनुसार आमदारांना दिलेले हक्क तुम्हाला मान्य नाही. पंतप्रधान, राज्यपाल, न्यायाधीश अशा घटनात्मक पदांचा आदर करीत नाही. राज्यपालांचे करायचे काय? यापेक्षा जमलं तर मंत्रिमंडळातील ‘सखाराम बाइंडर’ प्रवृत्तींचे करायचे काय? यावर चिंतन करा, असा चिमटा आशिष शेलार यांनी शिवसेनेला काढला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER