कायद्याचे राज्य आहे की एका ‘बबड्या’च्या फायद्याचे? – आशिष शेलार

Ashish Shelar-Sanjay Raut.jpg

मुंबई : निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्यानंतर यावर बोलताना शिवसेनेचे (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले – महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायदा हातात घेणारे कोणीही असले तरी त्याची गय केली जाणार नाही. यावर भाजपाचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राऊतांना टोमणा मारला – इथे कायद्याचे राज्य आहे की एका बबड्याच्या फायद्याचे?

या सरकारच्या काळातील याआधीच्या अशाच घटनांचा उल्लेख करत आशिष शेलार यांनी ट्विट केले – वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडण, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसांवर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांना मारहाण, पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया! पण, “इथे कायद्याचे राज्य” आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंग्यचित्र ‘फॉरवर्ड’ करणाऱ्या नौदलाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा निषेध करताना या भागाचे आमदार अतुल भातखळकर (भारतीय जनता पार्टी) यांनी शिवसेनेवर टीका केली – वयोवृद्ध माजी नौदल अधिकाऱ्याला सहा-सात जणांनी मिळून केलेली मारहाण जनतेला भुरट्या गुंडांचा ‘षंढपणा’ वाटत असली तरी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना मात्र ती ‘संतप्त व उत्स्फूर्त’ प्रतिक्रिया वाटते! विश्वास ठेवा, हा ठाकरे सरकार पुरस्कृत दहशतवाद एक दिवस जनताच पूर्ण ताकदीने ठेचून काढेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER