आशिष नेहराला आजरा घनसाळ तांदळाची भुरळ

Ashish Nehra

कोल्हापूर : भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish Nehra) आजऱ्याहून मुंबईकडे जाताना आजरा शहरात थांबले असता त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. काहींनी संवाद साधत त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. दरम्यान, यावेळी नेहरा यांनी आजरा घनसाळ व काजूची खरेदी केली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नेहरा निवृत्त झाले असले तरी त्यांच्याकडे आयपीएलची प्रशिक्षकपदाची जबाबदारी असल्याचे समजते. तब्बल १८ वर्षे ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये होते. तीन ते चार वर्षापूर्वीच ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. मात्र, आजही त्यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. नेहरा गोव्याला कुटुंबासह सहलीला गेले होते. ते परत जात असताना आजरा-आंबोली मार्गावरील अपर्णा स्नॅक सेंटरवर काही वेळ थांबले. आशिष नेहरांना पाहताच ये-जा करणारी वाहने थांबून चाहत्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. यावेळी जयसिंग खोराटे यांनी त्यांना आजरा परिसराची माहिती दिली. यावेळी चाहत्यांनी नेहरांचे स्वागत केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER