गृहमंत्र्यांवर पुतण्याची घणाघाती टीका!

anil deshmukh-Ashish deshmukh

नागपूर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर त्यांचे पुतणे माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी घणाघाती टीका केली आहे. प्रत्येक व्यक्ती हा निवृत्त होतो, आता अनिल देशमुख यांची वेळ आली आहे. गृहमंत्री हे आपल्या मतदारसंघातून गायब आहेत. गेल्या सव्वा वर्षांमध्ये त्यांच्या मतदारसंघात कोणतेही काम झालेले नाहीत. त्यामुळे मी पुन्हा सक्रिय झालो पाहिजे, अशी जनतेची आणि कार्यकर्त्यांची मागणी होती, असे आशिष देशमुख म्हणाले.

“जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी माझा हातभार लागावा अशी इच्छा आहे.” असे आशिष यांनी सांगितले. अनिल देशमुख हे औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतात हे माहीत आहे. त्यांनी याबद्दल स्पष्टीकरणही दिले असेल. त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे. “राजकारणाशी माझ्या कार्यक्रमाचा संबंध नसला तरी खऱ्या अर्थाने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग या वर्षात चालू होण्याची चिन्हे नाहीत. सर्वेक्षणातून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिक नुकसान होत असल्याचे दिसत आहे.” असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मतदारसंघात फिरत आहेत. मग ते काँग्रेसचे असो किंवा शिवसेनेचे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. आम्हीसुद्धा तोच प्रयत्न करतो आहे. येत्या काळात काँग्रेस हा पक्ष स्वबळावर राज्यात सत्तेत येईल, असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER