काकांनी निवृत्त होण्याची वेळ आली आहे – आशिष देशमुख

ashish deshmukh criticised state home minister anil deshmukh

नागपुर: राज्याच्या राजकारणात काका – पुतण्याचे राजकारण नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यातच नागपुरचे नेते देशमुख काका पुतण्यांमधील वाद राज्याला चांगलाच परिचित आहे. आता तर, गृहमंत्र्यांचे पुतणे आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी काकांनी निवृत्त होण्याची वेळ आली आहे असे वक्तव्य केले आहे. आशिष देशमुखांच्या या विधानाने काका पुतण्यांमध्ये वाद वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे दिसते.

आशिष देशमुख यांनी गृहमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विकासकामावरून टीका केली आहे.

“अनिल देशमुख हे नागपुरातील काटोल या आपल्याच मतदारसंघातून गायब आहेत. त्यांच्यावर काटोलची जनता नाराज आहे. गेल्या सव्वा वर्षात कोणतीही कामं झालेली नाहीत, त्यामुळे मी सक्रिय व्हावं, अशी जनता आणि कार्यकर्त्यांची मागणी होती” असं आशिष देशमुख ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले. तसेच , लॉकडाून व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा विचार करता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी परवानगी घेऊन मंदिर, शाळेत क्लासेस घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER