बंगालमधील हिंसाचारावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

Asaduddin Owaisi

नवी दिल्ली :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने (BJP) टीएमसीचे (Trinamool Congress) कार्यकर्ते हिंसाचार करत असल्याचा दावा केला आहे. या हिंसाचारात नऊ  कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झालेत, असे भाजपने म्हटले आहे. तसेच टीएमसीचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरांवरही हल्ले करत आहेत, असा दावाही भाजपने केला आहे.

बंगालमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी भाष्य केले आहे. ओवेसी म्हणाले की, “जीवनाचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे. नागरिकांचे रक्षण करणे हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य असायला हवे. मात्र, ते करत नसतील तर ते आपले मूलभूत कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरत आहेत आणि जीवनरक्षणाच्या बाबतीत सरकारच्या अपयशाची निंदा करतो.”

यापूर्वी, पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) चिंता व्यक्त केली आहे. राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) म्हणाले की, “पंतप्रधानांनी मला फोन केला आणि राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रती चिंता व्यक्त केली आहे. तत्पूर्वी, केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी राज्य सरकारकडून हिंसाचारासंदर्भात अहवाल मागविला आहे.”

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने चांगलाच विजय मिळवला आहे. टीएमसीने एकूण २९२ जागांपैकी २१३ जागा जिंकल्या. तर भाजपला ७७ जागाच जिंकता आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button