तीन पक्ष असल्याने भांड्याला भांड लागणारच, राऊतांच्या इशाराऱ्यानंतर जयंत पाटलांचं उत्तर

Sanjay Raut - Jayant Patil

मुंबई : खेड पंचायत समितीमध्ये शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) वाद चांगलाच रंगला आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्यावर संताप व्यक्त करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अत्यंत कडक शब्दात राष्ट्रवादीला थेट इशाराच देऊन टाकला. पालकमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलीप मोहिते पाटलांना वेसण घालावे, अन्यथा हा विषय शिवसेनेला सोपवावा. त्यासाठी शिवसेना समर्थ आहे, अशा शब्दात राऊतांनी दिलीप मोहिते-पाटलांवर संताप व्यक्त केला. त्यावर स्थानिक राजकारणात ३ पक्ष असल्यामुळे भांड्याला भांड लागणारच. आम्ही चर्चेतून मार्ग काढू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाधयक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं.

संजय राऊत यांच्या इशाऱ्याबाबत विचारलं असता जयंत पाटील म्हणाले, स्थानिक पातळीवर काही वाद झाला असेल तर चर्चेतून मार्ग काढता येतो. कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. स्थानिक राजकारणात तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडं लागणारच, पण आम्ही चर्चेतून मार्ग काढू. संजय राऊत काय बोलले हे आपल्याला माहित नाही, असं उत्तर जयंत पाटील यांनी दिलं. लॉकडाऊनच्या गोंधळाबाबतही जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे म्हणत वेळ मारून नेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button