दबाव वाढताच मारहाण करणाऱ्या ‘त्या’ शिवसैनिकांना पुन्हा अटक

Arrested - Shivsainiks

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं (CM Uddhav Thackeray) एक व्यंग्यचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी (Shiv Sena) नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांना जोरदार मारहाण केली होती. मात्र पोलिसांनी योग्य कलम न लावल्याने त्यांना तत्काळ जामीन मिळाला होता.

यावरून विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय राज्यात गुंडाराज सुरू असून राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणात सर्वच स्तरांवरून दबाव वाढत असल्याने आज पोलिसांनी त्या सहाही शिवसैनिकांना पुन्हा अटक केली आहे. त्यांच्यावर नव्याने कलमा लावून आजच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असून, आता न्यायालय किती दिवसांची कोठडी देते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER