मुख्यमंत्र्यांकडून प्रश्न सुटत नाही म्हणून जावे लागते राज्यपालांकडे – चंद्रकांत पाटलांचा टोमणा

Chnadrakant Patil & Bhagat Singh Koshyari

पुणे : मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे प्रश्न सुटत नाही म्हणून राज्यपालांकडे जावे लागते, असा टोमणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत व मुख्यमंत्र्यांना मारला.

पुणे येथे पत्रपरिषदेत संजय राऊत म्हणाले होते, राज्यात लोकनियुक्त सरकार अस्तित्वात आहे. त्यामुळे राज्यातील कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे. मात्र राज्याचे प्रश्न घेऊन सातत्याने राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. याला चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant patil) उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे फक्त नावालाच मुख्यमंत्री आहेत.शरद पवारच (Sharad Pawar) महाराष्ट्र चालवतात. यावर संजय राऊत यांनीच आता शिक्कामोर्तब केले आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील वाढीव वीज बिल, मराठा आरक्षण, ओबीसी समाज, धनगर समाज आरक्षण, अतिवृष्टीच्या नुकसान यांसह कोणत्याच प्रश्नावर मार्ग निघाला नाही. त्यामुळे जनतेच्या मनात मुख्यमंत्री हे कोणत्याही प्रश्नावर मार्ग काढू शकत नाही अशी भावना निर्माण झाली आहे. म्हणून सर्वजण आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यपालांची भेट घेत आहेत. निदान राज्यपाल तरी मुख्यमंत्री किंवा संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना सूचना देऊन त्यांचे प्रश्न निकाली काढतील अशी त्या नेते मंडळी व नागरिकांची अपेक्षा आहे.

सातत्याने कुणावर ना कुणावर टीका करत राहणे हा संजय राऊत यांच्या नोकरीचा भाग आहे. एक दिवस त्यांनी भाजपावर टीका केली नाही, देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्यावर अग्रलेख लिहिला नाही तर त्यांना जाब विचारला जाऊ शकतो! त्यांनी त्यांचे काम जरूर करावे.

सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडी सरकारने घटना बंदच करून ठेवली आहे. सरकारमधील सहभागी नेते वाट्टेल या शब्दात टीका करत सुटले आहेत. त्यांनी कुणावरही टीका केली तरी चालते मात्र, कुणी त्यांच्यावर टीका केली तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारतात! हे योग्य नाही. महाविकास आघाडी सरकारचे हे धोरण दुटप्पीपणाचे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER