मुख्यमंत्री भेटत नाहीत म्हणून शिवसेना नेत्याने घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

शिवसेना नेत्याने घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट

मुंबई : शिवसेना (Shiv Sena) नेते आणि राज्यमंत्री दर्जा असणारे किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली.राज्यातील प्रश्नांना घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका अलीकडेच शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. यापार्श्वभूमीवर तिवारी यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा रंगल्या आहेत .

किशोर तिवारी हे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष आहेत, विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यपालांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय द्यावा, खुद्द राज्यपालांनी या भागाचा दौरा करावा अशी मागणी किशोर तिवारी यांनी निवेदनद्वारे केली. इतकचं नाही तर राज्य सरकारकडून पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींची मदत घोषित केली आहे, ती पुरेशी नाही अशी तक्रारही किशोर तिवारींनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे केली.

दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा यांचा अनुशेष दूर करावा अशी मागणी राज्यपालांना केली, अतिवृष्टीमुळे पीडित शेतकऱ्यांना सरकारकडून देण्यात आलेल्या १० हजार कोटींच्या मदतीत विदर्भाला खूप कमी मदत मिळणार असल्याचं राज्यपालांना सांगितले, या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मुंबईत आलो होतो, पण मुख्यमंत्री भेटले नाहीत, त्यामुळे राज्यपालांकडे जाऊन भेट घेतली, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER