फडणवीसांनी वस्तुस्थिती मांडताच त्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्याची स्पर्धाच लागते !

Atul Bhatkhalkar & Devendra Fadnavis - Maharashtra Today

मुंबई :- महाराष्ट्रातील कोरोनाची खरी परिस्थिती आणि महाविकास आघाडी सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष नजरेत आणून देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यांच्या या पत्रावरून मोठे वादंग निर्माण झाले आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधत महाराष्ट्रद्वेष्टा नेता म्हणून उल्लेख केला होता. आता वागळे यांच्या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

‘महाराष्ट्रातील घाण आणि गरळ तर तुम्हीच रोज गिळता. तरी तुम्ही येथेच रहा. कारण हा सर्वसमावेशक महाराष्ट्र आहे आणि आम्ही सहिष्णू. देवेंद्रजी फडणवीस यांनी वस्तुस्थिती मांडली की त्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्याची जणू स्पर्धाच लागते. त्या मविआच्या गटारगंगेत आपलेही स्थान आहेच.’ असे म्हणत भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी वागळे यांचा समाचार घेतला.

तसेच गंगेतील मृतदेहांबाबत म्हणाल तर २०१५ मध्येसुद्धा गंगेत मृतदेह तरंगताना आढळले होते.  जेव्हा तेथे अखिलेश सरकार होते आणि कोरोना पण नव्हता. एनडीटीव्हीची (आपली आवडती आणि विश्वसनीय) लिंक आहे, १४ जानेवारी २०१५ ची! असे म्हणत त्यांनी एनडीटीव्हीलाही लक्ष्य केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button