बंगालमध्ये ‘एक्झिट पोल्स’ समोर येताच प्रशांत किशोर ‘तो’ दावा चर्चेत

Prashant Kishor - Maharashtra Today

कोलकाता :- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सर्व  राजकीय पक्षाची धाकधूक वाढली असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. एक्झिट पोल्सनुसार भाजप (BJP in West Bengal) बऱ्याच जागांवर विजय मिळवणार असल्याचं दिसत आहे. जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांची भविष्यवाणी खोटी ठरताना दिसत आहे. बहुतेक एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप 100 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवणार आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी निवडणुकीआधी असा दावा केला होता, की जर भाजपला तीन अंकी जागांवर विजय मिळाला तर मी राजकीय सल्लागाराचं काम सोडेल. अशात आता समोर येत असलेल्या एक्झिट पोलनुसार त्यांचा हा दावा खोटा ठरत असल्याचं चित्र आहे. अशात बंगाल निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलप्रमाणेच लागल्यास प्रशांत किशोर काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एग्जिट पोलनुसारच भाजपला 100 हून अधिक जागांवर विजय मिळाल्यास प्रशांत किशोर आपल्या दाव्यानुसार खरंच राजकीय सल्लागाराचं काम सोडणार का? याची आता चर्चा रंगली आहे. किशोर यांनी असा दावा केला होता, की बंगाल निवडणुकीत भाजप तीन अंकी डिजीट पार करू शकणार नाही. असं झाल्यास ते आपलं काम सोडून देतील. त्यांनी असंही म्हटलं होतं, की भाजप केवळ वातावरण निर्मिती करतं, प्रत्यक्षात मात्र काहीच करत नाही.

बंगालमधील चौथ्या टप्प्यातील मतदानादरम्यानच प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ चॅट समोर आली होती. यात ते तृणमूलच्या पराभवाविषयी बोलत होते. ही ऑडिओ चॅट भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शेअर केली होती. यात प्रशांत किशोर यांनी मान्य केलं होतं, की बंगालमध्ये भाजप जिंकणार आहे. मात्र, प्रशांत किशोर यांनी याला साफ नकार देत संपूर्ण बातचीत समोर आणण्यास म्हटले होते . हा त्या संभाषणातील काहीच भाग असल्याचा दावा त्यांनी केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button