पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होताच मोदी सरकारने वाढवले पेट्रोल-डिझेलचे दर

petrol prices

मुंबई :- पाच राज्यांमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारने (Modi Govt.) अपेक्षेनुसार पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले. आज पेट्रोल १५ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले. ६६ दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये २७ फेब्रुवारीपासून कोणतीही वाढ झाली नव्हती. मार्च महिन्यात इंधनाच्या दरामध्ये चारवेळा कपात झाली. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपरिहार्य होते.

मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका सुरू असल्याने केंद्र कोणताही धोका पत्करायला तयार नव्हते. परिणामी, मतदानाचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर मोदी सरकार कृत्रिमरीत्या कमी ठेवतील, असा जाणकारांचा अंदाज होता. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये आता नवे सरकार स्थापन होईल. यापैकी आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत भाजपला अपेक्षित यश मिळाले. मात्र, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.

सकाळी जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. ६ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल-डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात.

ही बातमी पण वाचा : ‘मन की बात’ आहे पण मनातलं नाही, मुख्यमंत्री आहेत पण रस्त्यावर नाहीत;   मनसेचा मोदी , उद्धव ठाकरेंना टोला   

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button