ई-पास रद्द होताच दिवसा कोल्हापुरात 55 हजार वाहनांची एन्ट्री

vehicles entered Kolhapur

कोल्हापूर : जिल्ह्यात आजपासून ई-पास रद्द करण्यात आला. त्यामुळे इतर जिल्ह्यातून कोल्हापूर येणारे सर्व नाके हटविण्यात आले आहेत. किणी, कोगनोळी, गगनबावडा, सांगलीसह इतर ठिकाणाहून एका दिवसात सुमारे लहान मोठी सुमारे 55 हजार वाहने कोल्हापूर जिल्ह्यात आली . तसेच 20 हजार वाहने या सर्व नाक्यावरून बाहेर गेली आहेत. आता या सर्वांची तपासणी, त्यांचे क्वारंटाईन, आरोग्याची काळजीही घेण्याची जबाबदारी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेवर आहे. लोकांनी स्वत:हून आता आपली काळजी घ्यावी लागणार आहे. असे झाले नाही तर मात्र, कोरोना संसर्ग पुन्हा नव्याने आणि गतीमान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दररोज कोल्हापूर जिल्ह्यात इतर ठिकाणाहून येणारे सरासरी चार हजार लोकसंख्या होती. लॉकडाऊन कडक केल्यानंतर तसेच ई-पास तात्पुरता बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा किंवा अतिदक्षतेसाठी म्हणून दररोज दीड हजार लोक कोल्हापूरमध्ये आले होते. आजपासून ई पास रद्द करण्यात आला . त्यानुसार आजपासून कोल्हापूरात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER