राज ठाकरेंनी आवाहन करताच मनसेचे फिरते ऑक्सिजन सेंटर सुरू, वाचले तिघांचे प्राण

MNS oxygen center

सोलापूर :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असताना औषधी आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यभरातील पदाधिकारी आणि मनसैनिकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनही तात्काळ दाखल घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी कोविड मदत केंद्रे सुरू केली आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे शहराध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी १० मे रोजी मनसेच्या फिरत्या ऑक्सिजन सेंटरची सुरुवात केली. या फिरत्या ऑक्सिजन सेंटरची सुरूवात होताच तिघांचा प्राण वाचला. ११ मे रोजी सुहास कांबळे, १२ रोजी सत्यवान बोडरे, तर १३ रोजी मारुती गाडेकर यांचा जीव वाचला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button