राज ठाकरेंनी आवाहन करताच मनसे नगरसेवकाने उभारले ८० खाटांचे कोविड रुग्णालय

Vasant More - COVID Beds - Raj Thackeray

पुणे :- कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयांत जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे पुण्यात भीतिदायक चित्र निर्माण झाले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांवर बैठका घेत आहेत. मात्र रुग्णांची परवड सुरूच आहे. आणि अशातच सरकारने आणि प्रशासनाने बोध घ्यावा, असे सत्कार्य मनसेचे (MNS) नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी केले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना आवाहन केले होते. कोरोना परिस्थितीला सामोरे जा. कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी मागेपुढे बघू नका, असे आदेश त्यांनी दिले होते. त्यांच्या या आदेशाची दखल घेत आणि पुण्यातील गरज लक्षात घेऊन वसंत मोरे यांनी अवघ्या पाच दिवसांत कात्रज येथे कोविड रुग्णालय उभारले.

पाच  दिवसांत जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये  ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो, तर मग पुणे महानगरपालिकेच्या १६८ नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त १० बेड केले असते, तर आज संपूर्ण पुणे शहरात १ हजार ६८० बेड तयार झाले असते आणि आपण पुणेकरांना वाचवू शकलो असतो. अजूनही वेळ गेलेली नाही, असे म्हणत मोरे यांनी प्रशासनाला अशा प्रकाराचे कोविड रुग्णालय उभारण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button