खाजगी रुग्णालये जीवाशी खेळतायंत, कडक कारवाई करा; सतेज पाटलांची आक्रमक भूमिका

Satej Patil

कोल्हापूर : काहीशी कोरोना (Corona)रुग्णांची संख्या आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात गेले महिनाभर कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच उपचार करायला सांगून शेवटच्या क्षणी त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवण्यात येत आहे, असा प्रकार काही खासगी रूग्णालये करत असल्याचे समोर आले आहे. यावरून आता पालकमंत्री सतेज पाटील ( Satej Patel)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत. रोज हजारावर रूग्ण आढळत आहेत. सरकारी रूग्णायात बेड उपलब्ध नाहीत. अशावेळी अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात जात असतात. या रुग्णांना लक्षणे असल्यास त्यांना RT-PCR तपासणी करण्याच्या सूचना खासगी रुग्णालयाने द्यावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तरीही, काही खासगी रुग्णालये या सूचनांचे पालन करत नाहीत. रूग्णाचा आजार वाढल्यानंतर त्यांना शेवटच्या क्षणी सरकारी रूग्णालयात हलवण्याच्या सूचना दिल्या जातात. यामुळे अशा रुग्णालयाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

याचबरोबर, अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना सजेत पाटलांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे आता खासगी रुग्णालयांना थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button