फडणवीस यांच्या सूचनेनुसार कोल्हापुरात आयसीयू आणि ऑक्सिजनेटेड बेडचा प्रस्ताव शासनाकडे

Devendra Fadnavis

कोल्हापूर : विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस () यांनी काल कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी आयसीयू आणि बेडसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवा, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलून तो प्रस्ताव मान्य करून घेतो, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले होते.

या पार्श्वभूमीवर

जिल्ह्यातील वाढता संसर्ग आणि उपलब्ध खाटांची व्यवस्था लक्षात घेवून यापैकी काही खाटांचे आयसीयू बेडमध्ये रुपांतर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 300 आयसीयू आणि 400 ऑक्सिजनेटेड नवीन बेड तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

यामध्ये सीपीआर, आयजीएम इचलकरंजी, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज, संजय घोडावत विद्यापीठ, इएसआयएसएच, ग्रामीण रुग्णालय पारगाव किंवा एमजीएम हे खासगी रुग्णालय याठिकाणी हे आयसीयू बेड तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आयसीयू सुविधा आणि मनुष्यबळासाठी खासगी संस्थेकडून निविदा मागविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालय निहाय वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात तीन अधीक्षक अभियंता, वन विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या सुविधा येत्या दहा ते बारा दिवसात पूर्ण होतील, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER