राज ठाकरेंच्या आदेशानुसार लोकांसाठी मनसे धावली, राज्यभरात मदतकार्याला सुरूवात

Maharashtra Today

मुंबई : सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा(Corona) उद्रेक वाढत असल्याने ‘ठाकरे’ सरकारने राज्यभरात कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे उद्योग, व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. उद्योग आणि व्यवसाय जवळपास ठप्प पडल्याने कामगारांवर घर चालवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच सकाळी ११ नंतर संचारबंदी सदृश्य नियम असल्याने पोलीस कर्मचारीही दिवसभर रस्त्यांवर उभे असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मदतीच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मनसेने राज्यभरात मदतकार्याला सुरूवात केली आहे. ठिकठिकाणी जेवणाचे पॅकेट्स, रेशन, पाणी पुरवठा, आणि कोविड मदत केंद्रे सुरू केले आहेत.

अमरावती येथे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना, पोलीस कर्मचाऱ्यांना तसंच निराधार व्यक्तींना मनसेतर्फे दररोज अल्पोपाहाराचं वाटप करण्यात येत आहे. रत्नागिरीतील दुर्गम वाड्यांमधील माता-भगिनींची पाण्यासाठी वणवण सुरु होती. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण ह्यांना ही बाब समजताच त्यांनी पाण्याचे टँकर रत्नागिरीत पाठवले आणि सरचिटणीस वैभव खेडेकर ह्यांनी तत्परतेने ते पाण्याचे टँकर तहानलेल्या वाड्यांपर्यंत पोहचविले. धुळ्यातील साक्री येथे प्रतिपिंड चाचणी व इच्छुक प्लाझ्मा दात्यांची तपासणी व नोंदणी केली जात आहे. मनविसे उपजिल्हाध्यक्ष ॲड. सायली सोनवणे, जनहित कक्षाचे उपाध्यक्ष धीरज देसले व सहकारी यांच्यातर्फे कौतुकास्पद उपक्रम सुरू आहे. मुंबईत अंधेरीचे विभागाध्यक्ष रोहन सावंत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर, गोरेगाव येथे विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव ह्यांच्या पुढाकारातून कोव्हीड उपचार मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button