पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघात तब्बल ६२ उमेदवार

Pune Divisional Graduate election

कोल्हापूर : पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल ६२ उमेदवार यंदा आमदार होण्यासाठी निवडणुकीत तरुणांचा कौल मागत आहेत. यापैकी १२ उमेदवार हे पक्षाकडून आहेत तर अपक्ष उमेदवारांची संख्या ५० इतकी आहे. मोठया संख्येने उभे ठाकलेले कुणासाठी हितकारक व कुणासाठी मारक ठरतात हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे. पदवीधर मतदारसंघामधील आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. तर राष्ट्रवादिी काँग्रेसने पदवीधर मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. याशिवाय अन्य उमेदवार मोठया संख्येने मैदानात उतरल्याने निवडणुकीत रंग भरू लागला आहे.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण गणपती लाड (कुंडल, सांगली), महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अॅड. रुपाली पाटील ठोंबरे ( पुणे), भारतीय जनता पक्षाचे संग्राम संपतराव देशमुख (कडेपूर, सांगली), आम आदमी पक्षाचे डॉ. अमोल रामचंद्र पवार (पलूस, सांगली), अखिल भारत हिंदू महासभेचे कपिल शंकर कोळी (सोलापूर), प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे कृपाल कृष्णराव पलूसकर (मांजरी,जि.पुणे), संभाजी ब्रिगेड पार्टीचे इंजिनीअर मनोज गायकवाड (पुणे), नेताजी काँग्रेस सेनेचे मिलिंद काशिनाथ कांबळे (उल्हासनगर),प्रजासत्ताक भारत पक्षाचे देशसेवक लक्ष्मण आण्णासाहेब चव्हाण (कोथरुड पुणे), जनता दल सेक्युलरचे माजी आमदार प्रा.शरद पाटील (कुपवाड, मिरज), वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ जनार्दन साळुंखे (कवठेएकंद, ता. तासगाव), इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टीचे अॅड. हनीफा अ. खान (पुणे) असे बारा उमेदवार हे पक्षीय आहेत. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. त्यांच्यासह नीता ढमाले यांनी ही अपक्ष म्हणून बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीपुढे यंदा पुन्हा बंडखोरीचे आव्हान आहे.

अपक्षांनी मोठया संख्येने उतरले

पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये ५० जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. यामध्ये डॉ. अभिजित बळीराम साठे (बिबी दारफळ, सोलापूर),अभिजित वामनराव बिचकुले (सातारा), अमर संतोष माने (उजळाईवाडी, ता. करवीर), अरुण लाड (काळेवाडी, पुणे), आसीफ महीबूब शेख (केम, तो करमाळा), प्रा. निळकंठ काशीनाथ खंदारे (सांगोला), गणेश जगदीश काकडे (वाणेवाडी, ता. बारामती), गणेश सुखदेव काटकर (वडजल, ता. माण), गोवर्धन महेंद्र राजेशिर्के (मोरेवाडी, ता. करवीर), चंद्रकांत परमेश्वर सावंत (पुणे), जयंत रामचंद्र पाटील (तांबवे. ता. वाळवा), जयंत शंकर विभूते (कृष्णानगर, पुणे), धनंजय बाळकृष्ण गोंदकर (विश्रामबाग सांगली), निता ढमाले (चिंचवड पुणे), नितीन महादेव माने (सातारा), प्रविण भिमराव पाटील (कामेरी ता. वाळवा), बसवराज लिंगराज हिरेमठ (नागणसूर, ता. अक्कलकोट), बळवंत बाबूराव पोवार (पुनाळ, ता. पन्हाळा), बापू बाबासाहेब चंदनशिवे (बोहाळी, ता. पंढरपूर), बाळकृष्ण ज्ञानू यमगर (सांगली), निशा अनिल बिडवे (हडपसर पुणे), भारत बाबूराव व्यवहारे (रोपळे, ता. पंढरपूर), महारुद्र कडाजी तिकुंडे (न्यू विकासनगर, संगमनेर), महेश दशरथ म्हस्के ( कोथरुड पुणे), माणिक नामदेव बनकर (सैदापूर, ता. कराड), मानसिंग कृष्णराव जगताप (राजारामपुरी कोल्हापूर), मुकूंद हणमंत जाधवर (वालवड, ता. बार्शी), अॅड. मंगेश तुकाराम महामुलकर (महामुलकरवाडी, जि. सातारा), युवराज उत्तम पवार (धनकवडी पुणे), योगेश सुभाष ढगे (पुणे), राकेश सुभाष कांबळे (बावडा, ता. इंदापूर), अॅड. राजाराम शामराव पाटील (कुरळप, ता. वाळवा), अॅड. राजीव वसंतराव चव्हाण (वडूज, ता. खटाव), विजय शामराव लेंगरे (झिंजेवस्ती, ता. माळशिरस), विजयकुमार आप्पासाहेब पाटील (आटपाडी), शाहिदअहमद हयातचांद पिरजादे (चांद कॉलनी म्हैशाळ रोड), अभिजित विलासराव शिंदे (बोरगाव, ता. वाळवा.), प्रा. शिवाजीराव ज्ञानदेव बंडगर (ढोकरी, ता करमाळा), शंकर लखू पुजारी (सांगली), सचिन निवृत्ती शिंदे (आंबेगाव पठार पुणे), सचिन रामचंद्र खंडागळे (संगेवाडी, ता. सांगोला), सागर शरद भिसे (सातारा), सिताराम विठ्ठल रणदिवे (तुगंत, ता. पंढरपूर), सिद्धेश्वर ईराण्णा होनराव (कुंभारी, जि. सोलापूर), सुनील श्रीपती संकपाळ (शेडशाळ, ता. शिरोळ), संजय भिकाशी मागाडे (राजेंद्रनगर कोल्हापूर), अॅड. संतोष गणपत कमाने (गोपूज, ता. खटाव), श्रीकांत कालिदास चव्हाण (सुस्ते, तां. पंढरपूर), डॉ. श्रीमंत शिवाजी कोकाटे (शिवाजीनगर पुणे),हेमंत विजय जगताप (वानवडी पुणे).

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER