काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे : अशोक चव्हाण यांचे मत

Ashok Chavan

मुंबई :- काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिवस चर्चेचा विषय ठरला होता. नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवला. यानंतर काँग्रेसने नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा केली.

महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टिळक भवन येथे पदभार स्वीकारला. याबाबत पटोले यांनी ट्वीटरच्या माध्यमातून माहिती दिली. त्यानंतर ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) उपस्थित होते. पदग्रहण सोहळ्यात यांनी भाष्य केले की, “काँग्रेस आहे म्हणून सरकार आहे. काँग्रेसची भूमिका स्वीकारून हे सरकार चालेल यासाठी आपल्याला काम करावे लागेल. काँग्रेस सांभाळणे तुमच्या एकट्याचे काम नाही. आम्ही सगळे मंत्री, नेते, कार्यकर्ते तुमच्या सोबत आहोत. आम्हाला फक्त स्टेज वर बसवून चालणार नाही. प्रत्येक जण जिल्ह्यात किती लोक निवडणून आणतो हे महत्त्वाचे आहे.” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER