मी पक्षात होतो म्हणून कोकणात शिवसेनेची ताकद होती : नारायण राणे

Narayan Rane

सिंधुदुर्ग : कोकण म्हणजे शिवसेना (Shivsena) हे समीकरण केवळ माझ्यामुळे होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले. महाविकास आघाडीने भाजपला (BJP) दणका वगैरे  दिलेला नाही. आकडेवारी समोर आल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे.

पुढच्या वेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले. नारायण राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० पैकी ४७ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे. तर वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडू केला जात आहे. हा शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER