मी म्हणालोच ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहे : अतुल भातखळकर

मुंबई : जळगावमधील आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र वसतिगृहातील कथित घटनेसंदर्भात सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. तिथे कोणतेही गैरकृत्य घडले नसल्याचा निष्कर्ष समितीने अहवालात काढला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

देशमुख यांनी सांगितले की, “जळगावातील कथित घटनेसंदर्भात सहा महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने वसतिगृहातील सर्व १७ महिलांशी चर्चा केली. ४१ जणांच्या साक्षी नोंदविल्या. समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला वसतिगृह असल्याने तिथे पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. पोलिसांनी त्या कथित घटनेचा व्हिडीओ काढला. याबाबत कोणताही व्हिडीओ पुरावा म्हणून समितीला मिळाला नाही.”

“जळगाव महिला वसतिगृहाच्या गैरप्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेला खुलासा सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा आहे, असे अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ट्विटरद्वारे सांगितले. तसेच मी म्हणालोच होतो ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहेत.” असे सांगत ठाकरे सरकारला टोला लगावला.

बदनामी नको

शासकीय वसतिगृहात पीडित आणि घटस्फोटित महिला राहतात. त्यांची अशाप्रकारची बदनामी करणे योग्य नाही. आशादीप वसतिगृह महिला व बालविकास विभागामार्फत चालविले जाते. ज्या महिलेने तक्रार केली, तिची मानसिक स्थिती ठीक नाही, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER