भाजपकडून शिवसेनेला जश्यास तसे उत्तर, सेनेचे १० नगरसेवक भाजपात

BJP

रायगड : मुक्ताईनगर नगर परिषदेतील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मोठा धक्का देत बुधवारी सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत शिवबंधन मनगटावर बांधले. तर आणखी आज चार नगरसेवक शिवबंधन बांधणार आहेत. मात्र भाजपनेही (BJP) आज शिवसेनेला (Shivsena) जश्यास तसे उत्तर दिले आहे. शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या १४ नगरसेवकांपैकी तब्बल १० नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे.

आज कोल्हापूर येथे हा पक्षप्रवेशाचा सोहळा संपन्न झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भविष्यात तुम्हा सर्व नगरसेवकांना भाजपात आल्याचा पश्चाताप होणार नाही. भाजप सर्वाना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे भविष्यातील काळजी आपण करु नये, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी पक्षात आलेल्या नगरसेवकांना दिले.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषद शिवसेनेसाठी महत्वाची मानली जाते. थंड हवेचे ठिकाण असल्याने या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. उत्पन्नाच्या दृष्टीने ही नगरपरिषद महत्वाची म्हणून ओळखल्या जाते. माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्या सह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यामुळे १४ पैकी १० नगरसेवकांनी भाजपला जवळ केल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आकाश चौधरी, राकेश चौधरी, सोनम दाबेकर, प्रतिभा घावरे, सुषमा जाधव, प्रियांका कदम, ज्योती सोनवळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव, रुपाली आखाडे या १० नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button