बाळासाहेबांचे संस्कार जिवंत असल्याने, उद्धव ठाकरे राजच्या बाजूने उभे झाले – सुप्रिया सुळे

Supriya Sule

मुंबई :- कोहिनूर मील व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु असून, शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ह्या राज ठाकरेंच्या बाजूने आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘राज ठाकरेंच्या चौकशीतून काहीही निष्पण्ण होईल असं वाटत नाही’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याबद्दलच बोलताना ‘बाळासाहेबांचे संस्कार अजूनही जिवंत आहेत. यामुळेच उद्धव ठाकरे यांनी भाऊ राज ठाकरेंची बाजू मांडत त्यांच्यासाठी अप्रत्येक्षपणे मदतीसाठी धावले आहेत.’ असंही सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंबाबत आपली सहानुभूती व्यक्त केली आहे.

ही बातमी पण वाचा : आता बाळासाहेबांच्या दोन वारसांना एकत्र येण्याची खरी गरज’, सोशल मीडियावर संदेशांचा पाऊस

राजवरील ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उचलतो त्याचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असा आरोपही त्यांनी केला. तसेचचौकशीसाठी निघालेल्या राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यसुद्धा आहेत. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. यावर उत्तर देतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ईडी चौकशीसाठी कुटुंबासहीत जाणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर कुणीही टीका करण्याची गरज नाही. ‘अशा कठिण प्रसंगी कुणाच्याही मागे त्यांचे कुटुंबीय उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुणी गेलं तर त्यावर टीका करू नये’ असं सुप्रिया सुळे यांनी म्हटंल.

दरम्यान, राज ठाकरे आज सकाळी १०.३० वाजल्याच्या सुमारास आपल्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानातून निघाले. जवळपास अर्धा ते पाऊणतासापासून ते ईडीच्या कार्यालयात हजर आहेत. यादरम्यान राज यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित, मुलगी शर्मिला आणि सून मिताली असा सगळा परिवार उपस्थित आहे. राज ठाकरे यांना एकट्याला ईडी ऑफिसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय राज ठाकरेंची चौकशी होईपर्यंत परिसरात असलेल्या हॉटेल ग्रँड येथे थांबलेले आहे.