वाघ होतो म्हणून बाळासाहेबानी मुख्यमंत्री पद दिले; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना उत्तर

Narayan rane-Uddhav Thackeray

मुंबई :- शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राणे कुटुंबीयांवर नाव न घेता टीका केली. राणेंना बेडूक म्हणालेत. या टीकेला बाळासाहेबांचा दाखला देऊन नारायण राणेंनी (Narayan Rane) उत्तर दिले – आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री पद दिले.

पत्रपरिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे म्हणालेत – आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीने स्वतःची प्रतिष्ठा राखली, काल त्याचा अभाव जाणवला. निर्बुद्ध शिवराळ बरळण म्हणजे कालच मुख्यमंत्र्यांच भाषण होत.

कोरोनाच्या काळात घरात बसून काम करत आहे. कोणी सांगितल तुम्हाला की हा वाघ आहे! पिंजऱ्यातला आहे की पिंजऱ्याबाहेरचा? असा टोमणा राणे यांनी मारला.

मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मला बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून पद दिली. आम्ही वाघ होतो म्हणून मला मुख्यमंत्री पद दिले. बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे. दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतल आणि बाहेरच सगळ बाहेर काढेन, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER