संभाजीराजेंची अवहेलना भाजपाला महाग पडेल; शिवसेनेच्या खासदाराचा इशारा

मुंबई :- मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी जवळपास एक वर्ष प्रयत्न करूनही संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी  भेट दिली नाही. संभाजीराजेंची ही अवहेलना भाजपाला महाग पडणार आहे, असा इशारा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी दिला.

मराठा आरक्षणाविरोधात भाजपाकडूनच रसद पुरवली जाते, असा आरोप त्यांनी केला. ‘वन मेरिट, वन नेशन’ ही संस्था मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे. या संस्थेचे सर्व प्रमुख हे भाजपाचे पदाधिकारी आहेत. या संस्थेने मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात वकील नेमून लढा दिला. त्यामुळे लोकांनी आता खरा शत्रू कोण आहे, हे ओळखावे, असे ते म्हणालेत.

मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सर्व हुकमाचे पत्ते पंतप्रधान मोदी यांच्याकडेच आहेत, हे संजय राऊतांचं वक्तव्य अगदी योग्य आहे. लोकसभेतही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली तेव्हा हा घटनादुरुस्तीचा मुद्दा आहे, हे मी सांगितले होते. मात्र, केंद्र सरकार जाणीवपूर्वक घटनादुरुस्ती करणे टाळते, असा आरोप त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : फक्त अल्टिमेटम नको, मराठा संघटनांना सोबत घेऊन मांडा भूमिका, विखे-पाटलांचा संभाजीराजेंना सल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button