खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती रद्द

Arvind Sawant

मुंबई :- राज्यात सत्ता समीकरणामुळे केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारे खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा सत्तेच्या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे. लाभाच्या पदामुळे येणारी अडचण पाहता खा. सावंत यांनी सदर अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी केलेली नियुक्ती रद्द केली आहे. या संदर्भात २० फेब्रुवारीला शासन निर्णय जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ फेब्रुवारी रोजी  शासन निर्णय काढून त्यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीचे अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. सोबत कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देऊन दिल्ली येथे त्यांना सर्व सुविधा व कार्यालयीन स्टाफ, भत्ते देण्याचेही आदेश देण्यात आले होते. परंतु या नियुक्तीमुळे ‘लाभाचे पद’ (ऑफिस ऑफ प्रॉफिट) या नियमामुळे अडचण निर्माण झाली.

ही बातमी पण वाचा : अब की बार बाप-बेटे की सरकार; भाजपाचा उद्धवला टोमणा

खासदारकी आणि मंत्रिपदाचा दर्जा यामुळे या पदाचे वेतन घेता येत नव्हते; शिवाय यामुळे खासदारकीपासून मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. केवळ भत्ते घेऊन समाधान मानण्यात खा. सावंत यांना रस नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी सदर पदाची सूत्रे स्वीकारण्यास नकार दिल्याने शासनाने त्यांची नियुक्ती रद्द केली आहे.


Web Title : Today’s Latest News is Arvind sawant’s appointment of chairman is canceled

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)