पत्रपरिषदेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांकडून तिरंग्याचा अपमान; केंद्रीय मंत्र्याचा आरोप

Arvind Kejriwal - Prahlad Singh Patel

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेवेळी राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Prahlad Singh Patel) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीचे उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं आहे. त्यांचा असा दावा आहे, की मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत चुकीच्या पद्धतीनं झेंडा लावला होता .

प्रल्हाद सिंह यांनी असा दावा केला, की ते अशा प्रकारे ध्वज लावतात, की यामुळे असं वाटतं, की ध्वजावरील हिरव्या रंगाच्या पट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. पटेल म्हणाले, की ज्या प्रकारे बॅकग्राउंडमध्ये तिरंगा लावला जातो, ते पाहून असं वाटतं, की तिरंग्यातील पांढऱ्या रंगाचा भाग कमी करून हिरव्या रंगाचा भाग वाढवण्यात आला आहे. हे राष्ट्रीय ध्वज संहितेचं उल्लंघन आहे. जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात तेव्हा संपूर्ण लक्ष त्यांच्या खुर्चीच्या मागे लावण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाकडे जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button