
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या आगामी ८ फेब्रुवारी रोजी होणा-या निवडणुकीसाठी सत्तारूढ आम आदमी पार्टी आणि विरोधी भारतीय जनता पार्टीच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे जाहीर होताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तावडेंवर जोरदार टीका केली आहे.
विनोद तावड़े जी महाराष्ट्र के पूर्व शिक्षा मंत्री है जिन्होंने 1300 सरकारी स्कूल बंद किए।अब ये दिल्ली में भाजपा का प्रचार करने आए हैं
मेरे दिल्लीवासियों,
आपने खूब मेहनत कर के सरकारी स्कूल शानदार बनाए।इन्हें अपने स्कूल दिखाना, छोले भटूरे खिलाना और दिल्ली दर्शन कराना। वो अतिथि है pic.twitter.com/Vo0KNRwBOf
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 29, 2020
केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माजी शिक्षणमंत्री असलेले विनोद तावडे यांनी महाराष्ट्रात १३०० सरकारी शाळा बंद केल्या आहेत. ते आता दिल्लीत भाजपचा प्रचार करण्यास येत आहेत. केजरीवाल यांनी म्हटले आहे की, माझ्या दिल्लीवासीयांनो, तुम्ही खूप मेहनत करून सरकारी शाळा चांगल्या बनवल्या आहेत. ते आले की, त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्लीदर्शन करून त्यांची रवानगी करा. ते आपले पाहुणे आहेत, अशा शब्दांत केजरीवाल यांनी विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे.
केजरीवाल यांनी यापूर्वीही एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते- दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी दिल्लीत २०० खासदार, ७० मंत्री आणि ११ मुख्यमंत्री येत आहेत. दिल्लीकरांनी पाच वर्षांत खूप मेहनत केली आहे. त्यांच्या मेहनतीचा अपमान करू नका. अतिथीदेवो भव, तुमच्यासाठी दिल्लीदर्शनची तयारी केली आहे. अक्षरधाम, लोटस मंदिराला भेट द्या, परत माघारी फिरा.
भाजपा के 200 MPs, 70 मंत्री और 11 CM,
आप लोग प्रचार के लिए दिल्ली आ रहे हैं।
दिल्ली वालों ने पाँच साल में ख़ूब मेहनत से दिल्ली को संवारा है।उनकी मेहनत का अपमान मत करना
अतिथि देवोभव।आपके लिए दिल्ली दर्शन का आयोजन किया है।अक्षरधाम, लोटस टेम्पल आदि का आनंद लीजिएगा
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 29, 2020