अरूणाचल प्रदेश भारताचाच भाग; अमेरिकेने चीनला सुनावले

India & China

वॉशिंग्टन : अरुणाचल प्रदेश चीनचा भाग आहे, असा दावा चीन करत असतो. सध्या भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावात अमेरिकेने चीनला दणका देताना सुनावले आहे – अरूणाचल प्रदेश भारताचाच भाग आहे, असे आम्ही मानतो.

अमेरिकेच्या गृह विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की – अमेरिकेने जवळपास ६० वर्ष अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग असल्याचे मानले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणत्याही प्रकारची घुसखोरी, सैन्य अथवा नागरिकांद्वारे भूभागावर दावा करण्याच्या एकपक्षीय प्रयत्नांना आम्ही विरोध करतो.

भारत आणि चीनने सीमा वाद द्विपक्षीय चर्चेतून सोडवावा, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत सैन्य बळ वापरण्याला विरोध असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. चीनकडून अरुणाचल प्रदेशवर दावा सांगण्यात येतो. तवांग आणि अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे. त्यामुळे भारताने अरुणाचल प्रदेशवरील दावा सोडावा, अशी मागणी चीनने काही दिवसांपूर्वीच केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER