अरूण गवळी याची प्रकृती चिंताजनक

Arun Gawli

नागपूर :- नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात डॉन अरूण गवळी याची प्रकृती चिंताजनक झाली आहे. अरूण गवळीला दोन दिवसांपुर्वी कोरोनाची (Corona) लागण झाली होती.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) याची प्रकृती गंभीर झाल्यानं त्याला शुक्रवारी (दि. १२) सकाळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात (मेडिकलमध्ये) हलविण्यात आले. गवळीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे दोन दिवसांपासून त्याच्यावर कारागृहातील रूग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र, त्याची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे त्याला शुक्रवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मेडिकलमध्ये नेण्यात आले.

मागील चार दिवसांपासून गवळीची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी गवळीसह इतर कैद्यांची ‘कोरोना’ चाचणी केली होती. त्यात गवळीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला. मागील चार दिवसांपासून अरूण गवळी याच्यावर तुरुंगातील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. गवळीला दिवसातून तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिली जात होती. परंतु, या उपचारांचा विशेष फायदा झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER