अरुण गवळीला तळोजा कारागृहात आत्मसमर्पण करण्याचा आदेश; पॅरोलमध्ये वाढ करण्यास नकार

Arun Gaoli

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. न्यायालयाने अरुण गवळीला नवी मुंबईमधील तळोजा कारागृहात जाऊन आत्मसमर्पण करण्याचा आदेश दिला आहे. अरुण गवळीने पॅरोल वाढवून देण्यासाठी अर्ज केला होता.

यावेळी त्याने आपण कोणतंही गैरकृत्य तसंच लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचा युक्तिवाद केला; पण न्यायालयाने चांगली वर्तवणूक किंवा नियमांचं उल्लंघन न केल्याच्या धर्तीवर पॅरोल वाढवला जाऊ शकत नाही, असं सांगितलं.

तसंच पॅरोल वाढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचं खंडपीठानं नमूद केलं. यामुळे अरुण गवळीला पुन्हा कारागृहात परतावं लागणार आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याप्रकरणी नागपूर कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

 

MT LIKE OUR PAGE FOOTER