हेल्दी आणि फिट राहाण्यासाठी कलाकार वळतायत शाकाहाराकडे

Bhumi Pednekar - Anushka Sharma

नॉन व्हेज खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रोटीन्स मिळतात असे वाटते आणि त्यामुळेच मांसाहार केला जातो. बॉलिवूडमधील (Bollywood) कलाकार आपल्या प्रकृतीबाबत अत्यंत जागरुक असतात. अभिनयासोबतच त्यांची शरीरयष्टीही त्यांच्या कामासाठी आवश्यक असते. त्यामुळे नायक जिममध्ये घाम गाळत असतात तर नायिका चवळीच्या शेंगेसारखी शरीरयष्टी व्हावी म्हणून योगा आणि अन्य गोष्टींचा सहारा घेतात. नायक-नायिकांचे योगा आणि व्यायाम करतानाचे फोटो म्हणूनच व्हायरल होतात. नॉन व्हेजमुळेच शरीर सुदृढ राहाते असे नाही तर शाकाहारामुळे शरीराला आणखी पोषक तत्वे मिळतात याची जाणीव झाल्याने आता अनेक कलाकार शाकाहारी होऊ लागले आहेत. गेल्या एक-दोन वर्षात अनेक कलाकार शाकाहाराकडे वळल्याचे दिसून येत आहे. शाकाहाराकडे वळलेल्या कलाकारांवर एक नजर-

भूमी पेडणेकरनेही (Bhumi Pednekar) काही दिवसांपूर्वी मांसाहार सोडत असल्याची घोषणा केली आहे. मांसाहार सोडून शाकाहारी होत असल्याचे तिने सोशल मीडियावर जाहीर केले होते. भूमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शाकाहारी झाल्याची माहिती दिली आहे. लॉकडाऊनमध्ये मांसाहार सोडून शाकाहाराकडे वळत असल्याचे तिने म्हटले आहे. मांसाहारासाठी मारल्या जाणाऱ्या प्राण्यांकडे पाहाण्याची तिची नजर क्लायमेट वॉरियर बनल्याने बदलल्याने तिने हा निर्णय घेतला आहे.

भूमी पेडणेकरच्या या निर्णयाचे अनुष्का शर्माने (Anushka Sharma) स्वागत केले आहे. याचे कारण अनुष्का शर्मा स्वतःही शाकाहारी बनली आहे. भूमीचे व्हेजिटेरियन क्लबमध्ये स्वागत केले आहे. अनुष्का शर्माही पूर्वी मांसाहार करीत असे. तिनेह एक वर्षांपूर्वी मांसाहार सोडून शाकाहाराकडे वळली आहे. अनुष्काने शाकाहाराकडे वळण्याचे कारण सांगताना पोस्टमध्ये म्हटले आहे की, नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘द गेम चेंजर’ बघून तिला शाकाहारी व्हावेसे वाटले. या चित्रपटात फिटनेससोबतच शरीरासाठी आवश्यक अनेक गोष्टींची माहिती देण्यात आलेली आहे. हा चित्रपट पाहून माझे डोळे उघडले आणि मी शाकाहारी झाले असेही अनुष्काने म्हटले आहे.

शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) फिगर मेंटेन केलेली आहे. शिल्पा पूर्वी मोठ्या प्रमाणावर मांसाहार करायची. पण कोरोना काळात शिल्पाने जुलै महिन्यापासून मांसाहार सोडून शाकाहार स्वीकारला आहे. शिल्पानेसुद्धा सोशल मीडियावर याची माहिती देताना लिहिले आहे, गेल्या काही वर्षांपासून मला जाणवू लागले आहे की, प्राण्यांची वाढ करताना वन संपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. एवढेच नव्हे तर कार्बन डायऑक्साइड, मिथेन आणि नाइट्रेट ऑक्साइडसुद्धा वातावरणात पसरतो. क्लायमेट चेंजसाठी या गोष्टी जबाबदार आहेत. क्लायमेट चेंज होत असल्याने पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे.

अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) काही महिन्यांपूर्वी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आपले अवयव चांगले राहावेत आणि ज्यांना ते दान म्हणून दिले जाईल त्यांनाही निरोगी अवयव मिळावेत या हेतूने त्यानेही अवयवांना नुकसान पोहोचवणारे खाणे म्हणजेच कोल्ड ड्रिंक, कॉफी पिणे बंद केले आहे. तसेच मांसाहारही सोडला आहे. मी जेव्हा जाईन तेव्हा मी चांगल्या स्थितीतील अवयव सोडून गेले असे लोकांनी म्हटले पाहिजे असे रितेशला वाटते.

रितेशची पत्नी जेनेलियाही शाकाहारी झाली आहे. जेनेलियाने मात्र रितेशच्या अगोदर म्हणजे दोन वर्षांपूर्वीच तिने शाकाहाराचा स्वीकार केला आहे. प्राण्यांप्रती पाहाण्याची माझी नजर बदलली असून मी आता मांसाहार करू शकत नाही असे सांगून जेनेलिया म्हणते, सुरुवातीला मला जरा हे कठिण वाटले होते परंतु आता मला त्याची सवय झाली आहे.

शाहीद कपूर (Shahid Kapoor) अगोदर मोठ्या प्रमाणावर मांसाहार करीत असे. परंतु काही वर्षांपूर्वी त्याला शाकाहाराचे महत्व समजले आणि तो शाकाहाराकडे वळला. शाकाहार करीत असतानाही त्याने स्वतःच्या शरीरयष्टीकडे लक्ष देऊन शरीर कमावले आहे.

आलिया भट्टने (Alia Bhatt) 2017 मध्ये मांसाहाराला तिलांजली देऊन शाकाहाराकडे वळली होती. सोनाक्षी सिन्हाही खूप मांसाहार करीत असे. त्यामुळे तिचे वजनही वाढले होते. मात्र तिने शाकाहाराकडे लक्ष दिले आणि तिचे वजन कमी झाले आणि आता ती स्लिम आणि फिट दिसू लागली आहे.

लॉकडाऊनच्या (Lockdown) काळातच संजय दत्तला (Sanjay Dutt) कँसर झाल्याचे समोर आले होते. त्यावर त्याने उपचारही घेतले आणि आता तो पुन्हा शूटिंग करू लागला आहे. पूर्वी संपूर्णपणे मांसाहारी असलेल्या संजय दत्तनेही कोरोना काळात शाकाहाराचा स्वीकार केला आहे. मांसाहार बंद केल्याने शरीरात खूप फरक पडल्याचा दावा संजय दत्तने केला आहे.

यांच्यासोबतच सोनम कपूर, अक्षय कुमार, करीना कपूर, श्रद्धा कपूर, मलायका अरोरा यांनीही मांसाहार सोडून शाकाहाराची कास धरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER