कलाकारांचे उपोषण आंदोलन : सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याचे मंत्री यड्रावकरांचे आश्वासन

Artists' hunger strike

कोल्हापूर : कलापथक कलाकार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आश्वासननंतर स्थगित करण्यात आले. कलापथक कलाकारांसह इतर सर्व प्रकारच्या कला सादर करणाऱ्या कलाकारांना त्यांचे कार्यक्रम सादर करण्यासाठी परवानगी देण्याबाबत राज्य सरकार सकात्मक आहे. यासाठी आवश्यक ती नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकार लवकरच याचा निर्णय जाहीर करेल, अशी ग्वाही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी दिली.

मंत्री पाटील-यड्रावकर म्हणाले, करोना महामारीमुळे मागील सहा महिन्यांपासून सारे जग थांबले आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षण ही सर्व क्षेत्रे बंद आहेत. बेरोजगारी वाढली आहे. यातच कलापथकांसह वेगवेगळ्या कला सादर करून उपजीविका करणाऱ्या हजारो कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. करोना संसर्गामधून थोड्या प्रमाणात का होईना राज्य सावरत आहे. लॉकडाउनमधून अनेक बाबींना सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळेच कलापथकासह इतर कला सादर करून उपजीविका करणाऱ्या सर्व कलाकारांसाठी राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन या सर्व कलाकारांना आपले कार्यक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER