पोलीस उद्यानात कलाब्धि: आर्ट फेस्टीव्हल

कोल्हापूर :  कसबा बावड्यातील पोलीस उद्यान येथे शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 रोजी ‘कलाब्धि:’ आर्ट फेस्टीव्हल होत आहे. विविध स्पर्धा, पर्यावरण पूरक कलाकृतींची दालने, तज्ज्ञांची व्याख्याने, चित्र, शिल्प, मांडणी शिल्प, आर्किटेक्चर डिझाईन व स्पर्धा सादरीकरण असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर सहभाग असलेल्या चित्रकारांच्या प्रतिष्ठेच्या भारतीयत्व चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व मेघा किरण पाटील यांच्या हस्ते सकाळी 10 वा. होणार आहे.

विस्तारित समुद्रजोड रस्त्याचा अहवाल लवकरच सरकारला सादर करणार

या उपक्रमामध्ये शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी देशभरातून सहभागी झालेल्या, शिल्पकला व मांडणीशिल्प या प्रकाराची स्पर्धा सकाळी 8.30 वा. सुरू होईल. सायंकाळी 5.30 वा. सेमी क्लासिकल व सांस्कृतिक कार्यक्रम होईल. कलाब्धिच्या दुसर्‍या दिवशी रविवार दिनांक 23 रोजी सकाळच्या सत्रामध्ये 8.30 वाजल्यापासून भारतभरातून अभिजात चित्रकलेच्या भारतीयत्व मांडणाऱ्या या प्रत्यक्ष चित्रस्पर्धेची सुरुवात होईल. याबरोबरच दोन्ही दिवस कलाब्धिमध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमाची प्रत्यक्ष छायाचित्र स्पर्धा, पेपर क्राफ्ट कार्यशाळा, टेराकोटा कार्यशाळा, पर्यावरणपूरक रंगनिर्मिती कार्यशाळा, कंपोस्ट खत निर्मिती कार्यशाळा संपन्न होणार आहे