कोल्हापुरात कासवाला बसवले कुत्रिम पाय

Sea Turtle

कोल्हापूर : समुद्री कासवाला (Sea Turtle) कृत्रिम पाय बसवून जीवदान देण्यात आले. कासवाला कृत्रिम पाय बसविण्याचा हा देशातील पहिला प्रयोग कोल्हापुरात यशस्वी झाला आहे. डॉ. संतोष वाळवेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी ही किमया साधली आहे.

वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर सोमनाथ वेंगुर्लेकर या मच्छिमारांच्या जाळ्यात जखमी अवस्थेतील हे कासव सप्टेंबर महिन्यात आढळून आले. या कासवाचा पुढचा पाय जाळ्यात अडकून पूर्णपणे तुटला होता. मागील पायही तुटून पडण्याच्या स्थितीत होता. गंभीर प्रकृती असलेल्या या कासवाला कोल्हापूरच्या वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्रांकडे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कोल्हापूर वनवृत्ताचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी 25 दिवस उपचार केले. मात्र, दोन्ही पाय निकामी झाल्याने हे कासव पोहू शकत नव्हते. यामुळे या कासवाला कृत्रिम पाय (वर्हे) बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे कलाकार चंद्रकांत हल्ल्याळ यांनी दहा दिवसांत पायाची प्रतिकृती तयार केली. स्माईल डेंटल लॅबचे कृष्णात पोवार यांनी डेंटल इम्प्रेशनमध्ये पायाचा तसेच सांध्याचा साचा तयार केला. प्रदीप कुंभार यांच्या मदतीने यानुसार सिलीकॉनचा वापर करून कृत्रिम पाय तयार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER