संधिवात – आयुर्वेद विचार

Arthritis - Ayurveda

Physiotherapy and Arthritis - The Forge Clinic, Richmondजसे जसे वय वाढते तसे तसे हाडांच्या कुरबुरी सुरु होतात. कुणाला वेदना इतक्या तीव्र असतात की चालणे उभे राहणे सुद्धा असह्य होते. अनेकांना शल्यक्रियादेखील करावी लागते. बऱ्याच व्यक्तींमधे मध्यम वयातच संधीवाताची तक्रार दिसून येते. ज्या वयात फिरणे खाणे करीयर घराची जबाबदारी या सर्व गोष्टी करायच्या असतात तेव्हा औषध दवाखान्यात फेऱ्या सुरु होतात. संधीवाताची नेमकी काय कारणे आहेत संधीवात होऊ नये म्हणून काय करावे ते बघूया – नावावरूनच लक्षात येते शरीराच्या संधीमधे वातविकार म्हणजे संधीवात. दोन वा तीन अस्थि एकत्र येऊन संधि तयार होतो. वातदोष त्रिदोषांपैकी एक दोष. प्राकृत वात शरीरात उत्साह, शक्ती, श्वास प्रश्वास, शरीराची हालचाल ( चालणे बोलणे उठणे बसणे इ.) मलमूत्र बाहेर फेकणारा, ज्ञानेंद्रीय कर्मेंन्द्रीय यांचे कार्य व्यवस्थित चालविणारा, जिथे चलनवलन, गति आहे उदा. रक्ताचे संवहन, अन्नरसाचे संवहन तिथे वात कार्य आहे. एवढे महत्त्वाचे कार्य प्राकृत वातदोष करतो. सांध्यांची प्राकृत हालचाल सुद्धा वातामुळेच. त्यामुळे या वात दोषाला कामे भरपूर असतात. म्हणूनच वातदोषाला काहीच अडचण न येता कार्य करू देणे महत्त्वाचे! वात दोष वाढला किंवा कमी (वृद्धी अथवा क्षय ) की रोग निर्माण होण्यास सुरवात होते. संधिवात, पाचनविकार, हृदरोग, वंध्यत्व असे अनेक विकार विकृत वात दोषामुळे होऊ शकतात. सांध्यांमधे विकृत वातदोष हाड ठिसूळ करणे, सूज, हात पाय हलविल्यास तीव्र वेदना निर्माण करतो. सांध्याचा आकार वाढलेला दिसतो.

सांध्यांमधून आवाज येणे अशी लक्षणे दिसून येतात.

संधीवात व्याधी होण्याची कारणे काय ?

 • सांध्याला पडल्यामुळे, अपघातामुळे इजा होणे.
 • तेल तुपाचा जेवणात समावेश नसणे.
 • अतिव्यायाम, अतिश्रम यामुळे शरीरातील स्निग्धता कमी होते.
 • भूक असूनही कमी खाणे, षड रसात्मक आहार न घेता केवळ तिखट कडू तुरट रसाचे पदार्थ जास्त घेणे.
 • सतत रुक्ष आहार उदा. ब्रेड पाव बिस्कीट शेव फरसाण इ. यामुळे वात वाढतो.
 • लठ्ठपणामुळे सांध्यावरचा भार वाढणे.
 • थंड वातावरणात (सतत एसी वा थंड प्रदेश) राहणे. थंड पाण्यात काम करणे.
 • रोज अभ्यंग मालीश न करणे.
 • मल मूत्राचे इ. वेगधारण करणे. रात्री जागरण करणे.
 • अति गाडी चालवणे, प्रवास करणे त्यामुळे सतत सांध्याना धक्का बसतो.
 • अति शोक चिंता भय अशा वातावरणात असणे.
 • मैथून, व्यायाम, परिश्रम यानंतर योग्य पौष्टीक आहार न घेणे मालीश न करणे.
 • वय – वृद्धावस्थेत स्वाभाविकरीत्या वात वाढतो. शरीराचे अवयव क्षीण होतात. साध्यांची झीज होऊन सांधेदुखी होते.
 • जे लोक खूप बारीक असतात त्यांना देखील संधिवाताची लक्षणे दिसतात.
 • अशा विविध कारणांनी वात वाढतो व सांध्यामधे त्रास सुरु होतो.

ayurveda

ही बातमी पण वाचा : त्रिफळा – अनेक व्याधींचे त्रिफळा उडविणारे एक औषध !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER