‘फेक टीआरपी’ घोटाळाप्रकरणात अटक केलेले ‘ते’ १३

TRP Scam Arrested

मुंबई :- फेक ‘टीआरपी घोटाळा’ (Fake TRP scam) प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रिपब्लिक चॅनेलचे सीईओ विकास खानचंदानी यांना आज (१३ डिसेंबर) अटक केली. फेक ‘टीआरपी घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. (BARC Fake TRP Racket Republic Channel 13 People Arrest)

टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी यापूर्वी विकास खानचंदानी यांना समन्स पाठवला. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेत बोलवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या अनेक महिन्यांपासून टीआरपी घोटाळ्याप्रकरणी तपास सुरू  आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे व तारीख
१) विशाल वेद भंडारी, ७ ऑक्टोबर
२) बोंम्पेल्लीराव नारायण मिस्त्री, ७ ऑक्टोबर
३) शिरीष सतीश पट्टण शेट्टी, ८ ऑक्टोबर
४) नारायण नंदकिशोर शर्मा, ८ ऑक्टोबर
५) विनय राजेंद्र त्रिपाठी, १२ ऑक्टोबर
६) उमेश चंद्रकांत मिश्रा
७) रामजी दुधनाथ शर्मा
८) दिनेश पन्नालाल विश्वकर्मा
९) हरीश कमलाकर पाटील
१०) अभिषेक कोलवडे
११) आशिष अबीदूर चौधरी, २८ ऑक्टोबर
१२) घनश्याम सिंग
१३) विकास खानचंदानी, १३ डिसेंबर

बॅरोमीटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते. याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून काही जणांना अटक केली होती. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचे उघडकीस आले होते.

प्रकरण

“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन घरात दिवसभर हे चॅनेल सुरू  ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी ४०० ते ५०० रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ झाली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचाही तपास केला जाईल. ” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टीआरपी

टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (Television Rating Point ) असा आहे. यावरून प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. (BARC Fake TRP Racket Republic Channel 13 People Arrest)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER