चोरट्या सहा महिलांची टोळी गजाआड

Arrested

सांगली :- आता महिलाही टोळी करुन धाडशी चोर्‍या करु लागल्या आहेत. शहर पोलीसांनी अशीच सहा महिलांची टोळी गजाआड केले आहे. या टोळीने हॉटेल वैशालीमधून सुमारे दीड लाखाचे साहित्य चोरले आहे.

कोल्हापूर रोडवरील हॉटेल वैशाली चा दरवाजा उचकटुन तोडून काढून स्वयंपाक घरातील साहित्य आणि खुर्च्या असे सुमारे दीड लाखाचे साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर शहर पोलीसांनी चोरट्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तपासादरम्यान हा गुन्हा महिलांच्या टोळीने केल्याचे उघडकीस आले. शहर पोलीसांनी शहरातील इंदिरानगर वसाहतीनजिकच्या विठ्ठलनगरमध्ये राहणार्‍या चोरट्यां महिलांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. यामध्ये ज्योती रवी काळे ( वय 35), सविता मारुती गोसावी (वय 32 ) , मंगल सोनु पवार (वय 30), रेखा रामदास जाधव (वय 38), कल्पना संजय गोसावी ( वय 35), सुजाता शंकर चौगुले (वय 35) आदी महिलांचा समावेश आहे. या महिलांना अनोळखी चोरट्यांनी सहकार्य केल्याचीही माहिती पुढे आली आहे. 21जून रोजी पहाटेच्या सुमारास हॉटेल वैशाली मध्ये चोरी केली होती. या टोळीकडून 15 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात पोलीसांना यश आले आहे.

पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास करताना हवालदार झाकिरहूसेन काझी गुंडोपंत दोरकर यांना टोळीबाबत महिती मिळाली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश बागाव, काझी, दोरकर , शिवलिंग मगदुम, दिलीप जाधव, विजय करांडे, विक्रम खोत , दिपाली कोळी यांच्या पथकाने सापळा लावून त्या महिलांना गजाआड केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER