मराठा आंदोलकांची धरपकड ; विधानभवन परिसरात तणाव,चव्हाणांना हटवण्याची मागणी

Maratha Andolan

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यानंतर आंदोलकांच्या एका गटाने विधानसभेची वाट धरली असता पोलिसांनी त्यांना तेथेच अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. त्यामुळे पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. मराठा आंदोलक आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य सरकारला घेरण्यासाठी पुणे, नाशिक, रायगड आणि मराठवाड्यातून मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. आंदोलकांनी आज सकाळपासून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केलं. मात्र, दुपारनंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. या आंदोलकांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर जोरदार ठिय्या आंदोलन सुरू केलं. या आंदोलनात तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले असून आंदोलनात महिला आणि तरुणींचा सहभाग लक्षणीय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER