‘मलाही अटक करा…’, ट्विटरवर राहुल गांधींचे केंद्र सरकारला आव्हान

Rahul Gandhi - PM Narendra Modi

दिल्ली :- करोना लसीच्या (Coronavirus Vaccine) तुटवड्यावरून दिल्लीत “मोदी जी, हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” असे पोस्टर लावणाऱ्या १७ जणांना पोलीसांनी अटक केली. यासाठी, राहुल गांधी यांनी ‘मुझे भी गिरफ्तार करो’ असे ट्विट करून सरकारचा निषेध करत आव्हान दिले. या पोस्टर प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २१ ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत.

काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मलाही अटक करा असे आव्हान करत पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये “मोदी जी, हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया?” असा मजकूर आहे. राहुल गांधी यांनी आपला प्रोफाईल फोटोवरही पोस्टर ठेवले आहे. त्यानंतर लगेचच काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही आपले प्रोफाईल फोटो बदलत पोस्टर ठेवले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात करोना लसींचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. अनेक जण लसीकरण केंद्रावर जाऊनही लस मिळत नसल्याने हैराण आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर (Central Government) टीकेची झोड उठवली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button