अर्णव गोस्वामी सोडा ; जनहितासाठी भाजपने आंदोलन करावे : ना. जयंत पाटील

Jayant Patil

चिपळूण : एका कुटुंबातील दोघेजण मृत्युमुखी पडले आहेत. एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्याला कारणीभूत असलेल्या गुन्हेगाराला पाठिंबा देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करत असेल, तर हे दुर्दैवी आहे. त्यापेक्षा जनहितासाठी भाजपने एखादे आंदोलन हाती घ्यावे. आपण काय करतोय याचे भान भाजपला असायला हवे, असा टोला जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कोकण दौऱ्यावर असताना भाजपला लगावला.

पाटील हे चिपळूण दौऱ्यावर असताना ते म्हणाले, अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केली. मृत्यूपत्र लिहून ठेवले आणि त्यामध्ये अर्णव यांच्यासह अन्य दोघांची नावे आहेत. नाईक कुटुंबाने सतत न्यायाची मागणी केली. प्रथम पोलिसांनी अर्णव यांच्याकडे जाऊन त्यांचा जबाब घेतला. नंतर नाईक कुटुंबाने पुन्हा तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. त्या वेळी तथ्य आढळल्यानंतरच त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये राज्य सरकारचा संबंध येतोच कुठे, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER