पोलिसांनी मारहाण केल्याचा अर्णब गोस्वामींचा न्यायालयात आरोप

Arnab Goswami

अलिबाग : अलिबाग पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आज पहाटे त्यांच्या घरातून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायाधीशांसमोर गोस्वामी यांनी पोलिसांवर मारहाण केल्याचे आरोप केले आहेत. त्यामुळे न्यायालयाने गोस्वामी यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी आज (४ नोव्हेंबर) सकाळी पत्रकार अर्णव गोस्वामींना मुंबईतून अटक केली. त्यानंतर त्यांना सकाळी साडेअकराच्या सुमारास अलिबाग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दीड तास चौकशी केल्यानंतर गोस्वामी यांना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अर्णव गोस्वामी याने न्यायाधीशांसमोर पोलिसांवर आरोप केले. गोस्वामी यांनी केलेल्या आरोपानंतर न्यायधीशांनी अर्नबची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER