‘बाहेर येताच अर्णब १०० टक्के करणार भाजपाचा विरोध’; केआरकेचा वादग्रस्त दावा

मुंबई : रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना पोलिसांनी अटक केली आहे. वास्तुविशारद अन्वय नाईक (Anvay Naik) आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. नेहमी खळबळजनक ट्विट करणारा याबाबत अभिनेता कमाल आर. खान उर्फ केआरके (KRK) म्हटले आहे – कारागृहातून बाहेर येताच अर्णब १०० टक्के भाजपाचा (BJP) विरोध करणार!

वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे. कमाल खान याने म्हणते आहे – मला असे वाटते की कारागृहातून बाहेर पडताच अर्णब गोस्वामी १०० टक्के भाजपाच्या विरोधात बोलणार. कारण त्यांना भाजपाने मदत केली नाही. सुधीर चौधरी यांच्या बाबतीतही असच काहीस घडले होते. जेव्हा अटक झाली होती तेव्हा अहमद पटेल यांनी त्यांना मदत केली नाही. तेव्हापासून त्यांनी काँग्रेस विरोधात बोलण्यास सुरुवात केली. अशा आशयाचं ट्विट कमाल खानने केलं आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच नाव असल्याच सांगण्यात येते आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

रिपब्लिकचा दावा

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी घरात घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचाही त्यांचा आरोप आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्र नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा रिपब्लिकचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER