अर्णब आणखी अडचणीत, अलिबागनंतर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

Arnab Goswami

मुंबई :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबागनंतर आता मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध नवा गुन्हा दाखल केला आहे. अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कलम ३५३ नुसार अर्णब गोस्वामीवर केला गुन्हा दाखल केला आहे. सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचा-यांशी हुज्जत घालणे असे आरोप करत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी अर्णब गोस्वामींना अटक केल्यानंतर राज्यात वादविवाद सुरू झाला आहे. याप्रकरणात भाजपानं अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत नाईक परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. नाईक परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे, ही भाजपा भूमिका स्पष्ट आहे. मात्र, नाईक परिवाराची केस दाखवून स्वत:चा सूड घ्यायचा राज्य सरकारच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो. अशा बंद केसेस पुन्हा ओपन करण्यास लागलो, तर ठाण्यातील परमार बिल्डरची केसही ओपन करावी लागेल. त्या घटनेतल्या सुसाईड नोटमध्ये ज्यांचे नाव आहे, त्यानुसार राज्य सरकारला पळता भूई थोडी होईल. या घटनेवर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया द्यावी, असं आवाहन शेलार यांनी केलं आहे.

ही बातमी पण वाचा : ‘अर्णबला भेटायला गेल्यावर पोलिसांनी उचलून बाजूला फेकलं’, किरीट सोमय्यांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER