भाजपाच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? रोहित पवारांचा सवाल

Rohit pawar

मुंबई : रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या संवादावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या संवादावरून भाजपाला (BJP) सवाल केला आहे.

कथित पत्रकाराला भाजपाच्या वरपासून तळापर्यंतच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांच्या चॅटिंगवरुन दिसतंय. भाजपाच्या प्रसिद्धीसाठीच त्यांना ताकद दिली जात होती का? एखाद्या निर्णयापूर्वीच अशा प्रकारे माहिती लिक होत असेल, तर देशविरोधी शक्तीही याचा फायदा उठवू शकतात. हे लोकशाहीला घातक आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे याची चर्चा सुरू झाली. दोघांमधील संवादामध्ये मंत्र्याबद्दलही आक्षेपार्ह विधान करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर बालाकोट एअर स्ट्राईकबद्दलही संवाद झालेला असून, रोहित पवारांनी याच मुद्द्यावरून भाजपाला प्रश्न विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER