अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी

Arnab Goswami Taloja

मुंबई : रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami ) यांना आता अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात (Taloja-jail) हलवण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस त्यांना घेऊन नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सुरक्षेच्या कारणास्वत पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षांकडून यासंदर्भातील आदेश काढण्यात आले आहे .

इंटिरियर डिझाईनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात ४ नोव्हेंबरला अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अर्णव आणि इतर आरोपींना अलिबाग येथील नगरपालिकेच्या शाळेत तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या काळात अर्णव गोस्वामी यांनी उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात अनेकदा जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

ही बातमी पण वाचा : अर्णब’ छाप वृत्तपत्र स्वातंत्र्य! वृत्तपत्र स्वातंत्र्याचे गटार राजकारण्यांनीच केले – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER