अर्णब गोस्वामींना अटक करा; काँग्रेसची मागणी

Congress

मुंबई :- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअप चॅट मधून लक्षात येते की, गोस्वामींना संरक्षणविषयक महत्वाची होती. या माहितीचा त्याने दुरुपयोग केला का, याची चौकशी करण्यासाठी त्यांना तत्काळ अटक करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आज या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. सावंत म्हणालेत, पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालाकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामींना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून दिसते. ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली. हा देशद्रोहाचा प्रकार आहे.

ही माहिती गोस्वामींसारख्या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी कशी मिळाली, त्यांनी अजून कोणाला ही माहिती दिली का? त्यांनी स्वतः सांगितले आहे की ज्याने ही माहिती दिली तो मोदी सरकारमधील मोठा व्यक्ती आहे. याची चौकशी झाली पाहिजे. अर्णब गोस्वामी यांचे कृत्य हे ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट, १९२३, कलम पाचनुसार कार्यालयीन गोपनीयतेचा भंग करणारे आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून व कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करू असे आश्वासन दिले आहे, असे सावंत म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER